Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»After delivery : प्रसुतीनंतर डॉक्टरांकडून टॉवेल पोटातच; तीन वर्षे कोमात राहिलेल्या महिलेचा मृत्यू
    राज्य

    After delivery : प्रसुतीनंतर डॉक्टरांकडून टॉवेल पोटातच; तीन वर्षे कोमात राहिलेल्या महिलेचा मृत्यू

    saimatBy saimatNovember 22, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पतीच्या १७ वर्षे पाठपुराव्यानंतर राज्य ग्राहक आयोगाचे २६ लाख ५० हजार रुपये भरपाईचे आदेश

    साईमत/ पुणे/प्रतिनिधी :  

    पुण्यात सीझेरियन प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेच्या पोटात टॉवेल राहिला. यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला तीन वर्षे कोमात राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या पतीने १७ वर्षे न्यायासाठी लढा दिला अखेर राज्य ग्राहक आयोगाने रुग्णालय व डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीपणा आणि त्रुटीयुक्त सेवेसाठी जबाबदार धरलं रुग्णालय आणि डॉक्टरांना महिलेच्या पतीला २६ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    पाषाण येथील प्रशांत कुकडे यांनी सूस रस्त्यावरील जीवनदीप मेडिकेअर सेंटर आणि डॉ. दीपलक्ष्मी रगडे यांच्या विरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यांची पत्नी रूपाली यांना ८ ऑगस्ट २००८ रोजी दुसऱ्या बाळाच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सीझेरियन शस्त्रक्रियेनंतर टाके घालताना डॉक्टरांच्या लक्षात आलं की, टॉवेल महिलेच्या पोटातच राहिला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा टाके उघडावे लागले.

    नंतर लगेचच रूपाली यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना ‘एन्सेफॅलोपॅथी’ (मेंदूला सूज येणे) झाल्याने आणखी तिसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु दुर्दैवाने त्या कोमात गेल्या. तीन वर्षे कोमात राहिल्यानंतर १ मे २०११ रोजी त्यांचे निधन
    झालं.

    दरम्यान, २००८ मध्ये दाखल झालेल्या तक्रारीवर तब्बल सतरा वर्षांनी निकाल लागला आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे आणि सदस्य नागेश कुंबरे यांनी हा निकाल दिला. या निकालाने शस्त्रक्रियेनंतर निष्काळजीपणा, अत्यवस्थ रुग्णाला त्वरित उच्च-सुविधा केंद्रात न पाठवणे, तातडीने वैद्यकीय कागदपत्रे न देणे यांसारख्या ग्राहक सेवेतील त्रुटी आणि निष्काळजीपणा अधोरेखित झाला आहे. यापुढे रुग्णांच्या नातेवाइकांना ग्राहक आयोगाकडे दाद मागता येईल.

    तक्रारदारांचे वकील अॅड. ज्ञानराज संत यांनी सांगितले की, विलंबाने का होईना; पण न्याय मिळाला आहे. या निकालामुळे डॉक्टरांच्या कामाच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवण्यास आणि वैद्यकीय सेवेत पारदर्शकता आणण्यास मदत होईल.
    आयोगाने निष्कर्षात म्हटलं आहे की, प्रसूतीनंतर रुग्ण महिला अत्यवस्थ असतानाही तिला तातडीने उच्च दर्जाच्या रुग्णालयात पाठवलं नाही. रुग्णालय आणि डॉक्टरांनी ‘डिस्चार्ज’ सह इतर वैद्यकीय कागदपत्रे दीड महिन्यानंतर दिली.

    ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीने निष्कर्ष नोंदवला की, प्रसूतिपूर्वी महिला उपाशी नव्हती तिची श्वसननलिका सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजना केल्या नाहीत. शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी दक्ष राहणं आवश्यक होतं. याबाबी वैद्यकीय निष्काळजीपणा व त्रुटीयुक्त सेवा असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026

    Gangster Bandu Andekar’s House : अजित पवारांच्या पक्षाने कुख्यात गुंड बंडू आंदेकरांच्या घरात दिली २ तिकीटं; नव्या वादाला तोंड फुटणार?

    December 30, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.