साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथे महाराष्ट्र योगा असोसिएशन आणि जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत राज्यभरातून ४१९ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र योग असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ.अनिता पाटील यांनी केले होते. महाराष्ट्र योग असोसिएशन सचिव जातीन सोलंकी, चेअरमन चंद्रकांत पांगारे यांनी तांत्रिक कारभार सांभाळला. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ.निलेश चांडक, हरीश मुंदडा, सुभेदार मेजर प्रेमकुमार अर्चना सूर्यवंशी, गायत्री कुलकर्णी, शक्ति महाजन, नितीन विसपुते, भूषण लाडवंजारी, शिरीष तायडे, डॉ.विलास नारखेडे, प्रा.मंगला मोरे आदी उपस्थित होते.
आसामला राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पर्धक प्रतिनिधीत्व करणार
राज्यस्तरीय स्पर्धेतील विजयी संघात पुणे जिल्हा संघ प्रथम विजेता, द्वितीय नाशिक जिल्हा तर तृतीय जळगाव जिल्हा यांचा समावेश आहे. सर्व विजयी स्पर्धक योग फेडरेशन ऑफ इंडियाच्या आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनचे सदस्य सतीश पाटील, भाऊसाहेब पाटील, अंजली पाटील, सुमन राहणे, मीना वानखेडे, अक्षय सोनवणे, दीपक पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील तर आभार अक्षय सोनवणे यांनी मानले.