साईमत, रावेर : प्रतिनिधी
जनता आणि मतदारांचा विश्वास हीच माझी प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रचार दौऱ्यात जनतेने आणि मतदारांनी ज्या-ज्या समस्या मांडल्या, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य देऊ, असे आश्वासन रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी तालुक्यातील निंभोरा येथे नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी बोलताना दिले. तसेच येथील रेल्वे स्टेशनवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला दादर-अमृतसर एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी निंभोरा रेल्वेस्थानक परिसर आणि निंभोरा गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीत कार्यकर्त्यांनी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्यात प्रामुख्याने आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद बोंडे, माजी सरपंच डीगंबर चौधरी यांच्यासह सुनील कोंडे, मनोहर तायडे, काशिनाथ शेलोडे, बाळासाहेब पवार, मधुकर बिऱ्हाडे, भास्कर महाले, सतीश पाटील, सुनील विचवे, शाहीनबी खाटीक, नदीम शेख, प्रमोद कोंडे, अतुल चौधरी, आलमगीर खान, ललित कोळंबे, संजय महाजन, पंडित चिमकारे, अमोल गिरडे, दीपक मोरे, दिलीप सोनवणे, मिलिंद बोंडे, शोहेबखान, सुरेश चौधरी, संदीप खाचणे, रवींद्र भोगे, सुधीर मोरे, प्रदीप कोंडे, विवेक बोंडे, राजेंद्र चौधरी, दिलशाद शेख, किरण कोंडे, जगजीवन मोरे, इकबाल शेख, युनूस खान रफिक खान, अशोक पाटील, चेतन भंगाळे, गुणवंत भंगाळे, मुन्ना पिंजारी यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.