मंत्री गिरीष महाजनांचा खडसेंवर पलटवार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जामनेर येथील शनिवारी झालेल्या रा.काँ.च्या जाहीर सभेत आ.एकनाथराव खडसे यांनी भाजपा प्रवेशासंदर्भात केलेले वक्तव्य तसेच मंत्री गिरीष महाजन यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात रविवारी, २२ रोजी मंत्री गिरीष महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले की, एक वेळ येईल तेव्हा मी त्यांचा सर्व हिशोब चुकता करेल, असा पलटवार मंत्री महाजन यांनी केला आहे.
मंत्री महाजन पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मी राजकारणात एवढी लाचारी पहिल्यांदा पाहत आहे. अशा मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेत्याची अशी लाचारी अतिशय लाजीरवाणा हा विषय आहे. त्याची मला खंत वाटते. एकीकडे म्हणता भाजपाचा प्रचार केला. दुसरीकडे ते रा.काँ.चे आमदार आहेत. घरातच सर्व पदे पाहिजे. त्यांची भूमिका जनतेला समजली आहे. कितीही बडबड केली तरी माझ्या मतदार संघात जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. मी कामावर मोठा झालो आहे. रात्रंदिवस जनतेची कामे करतो. जनतेच्या सुख-दु:खाचा वाटेकरी आहे. रुग्णांची मोठी आरोग्य सेवा करीत आहे. त्यांनी कधी दोन रुग्णांना तरी दवाखान्यात नेण्याचे कार्य केले का? असा प्रश्नही मंत्री महाजन यांनी उपस्थित केला आहे.
रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांनी मुंबईत तरी माणूस ठेवला आहे का? उगाच काहीही बडबड करायची आणि आरोप करायचे. आता ते निरर्थक बोलून ते उघडे पडले आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. मी एवढे बोलेल की, त्यांना पळता मुश्किल होईल. पण काहीही बोलण्याची माझ्या पक्षाची संस्कृती नाही, असेही ते शेवटी म्हणाले.