साईमत, पुणे : प्रतिनिधी
राज्यात विभागीय स्तरावर आरोग्याचा कारभार पाहण्यासाठी सध्या आठ आरोग्य परिमंडळे असून त्याचे काम आरोग्य उपसंचालक पाहतात. मात्र, एका आरोग्य परिमंडळाच्या अंतर्गत तीन ते चार जिल्हे येत असल्याने आरोग्य उपसंचालकांवर त्याचा ताण येतो. त्यामुळे आता या आरोग्य परिमंडळांचा विस्तार होणार असून आठ आरोग्य परिमंडळांचे आता २० आरोग्य परिमंडळे आणि वीस आरोग्य उपसंचालक नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाचा विभागीय स्तरावरील कारभार हा परिमंडळांचे आरोग्य उपसंचालक पाहतात. सध्या राज्यात ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापुर, औरंगाबाद, लातुर, अकोला आणि नागपुर असे एकुण आठ परिमंडळ आहेत. त्या ठिकाणी आठ आरोग्य उपसंचालक आहेत. परंतू एका उपसंचालकाच्या अखत्यारित तीन ते चार जिल्हे येत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येतो. म्हणून आता ८ परिमंडळचे २० परिमंडळ करण्यात येणार असल्याची माहीती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. मोफत आरोग्यसेव्ोबाबत आरोग्यमंत्री म्हणाले की दरवर्षी रुग्णांकडून आरोग्याच्या सुविधांसाठी ६० ते ७० कोटी जमा होत होते. परंतू, ते पैसे वसूल करण्यासाठी यंत्रणा, मनुष्यबळ यांच्या पगारावरील खर्च हा १२० कोटी होतो. आता पैसे जमा करण्याची यंत्रणाच बंद केल्याने हे १२० कोटी वाचतील आणि ते मनुष्यबळ जेथे सेव्ोसाठी मनुष्यबळ कमी आहे तेथे वळवण्यात येईल.
आरोग्य संचालकांचा पदभार लवकरच
सध्या दोन्ही आरोग्य संचालकांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी दुस-या आरोग्य संचालकांना येत्या दोन ते तीन दिवसांत नियुक्ती दिली जाणार आहे. तसेच २०१३ पासून रखडलेली िंबदुनामावली तयार करून एमपीएससीद्वारे पद भरले जाणार आहे. मोफत आरोग्यसेव्ोबाबत आरोग्यमंत्री म्हणाले की दरवर्षी रुग्णांकडून आरोग्याच्या सुविधांसाठी ६० ते ७० कोटी जमा होत होते. परंतू, ते पैसे वसूल करण्यासाठी यंत्रणा, मनुष्यबळ यांच्या पगारावरील खर्च हा १२० कोटी होतो. आता पैसे जमा करण्याची यंत्रणाच बंद केल्याने हे १२० कोटी वाचतील.
