साईमत, जळगाव/एरंडोल : प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे अंगावर वीज पडून श्रीकांत भिका महाजन (वय ३२) हा युवा शेतकरी ठार झाला होता. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागदुली येथे जाऊन वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या कै. श्रीकांत महाजन यांच्या परिवाराचे सांत्वन केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रांताधिकारी व तहसिलदारांना मदतीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. मयताच्या परिवारास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी सभापती अनिल महाजन, माजी सदस्य नाना महाजन, सरपंच किशोर महाजन, माजी सरपंच अशोक पाटील, शाखा प्रमुख अजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.