मंत्रीपदाच्या माध्यमातून युवकांसाठी कल्याणकारी योजना आणणार

0
45

साईमत/ न्यूज नेटवर्क/धानोरा, ता. चोपडा :

मोदी सरकारच्या सर्व योजना घराघरापर्यंत पोहचविणार आहे. तळागाळातील सर्वसामान्य घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त कशा प्रकारे होईल, त्यावर माझे विशेष लक्ष असणार आहे. धानोरासह परिसरातील विविध प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक करण्यासाठीही प्रयत्नशिल असणार आहे. तसेच मंत्रीपदाच्या माध्यमातून युवकांसाठी कल्याणकारी योजना आणणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांनी केले. तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षाताई खडसे यांचा धानोरा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कारासह साखरतुलाचे येथील सतपंथ ज्योत मंदिरात आयोजन केले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, ‍मतदारांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यांच्या मतदानाच्या आशीर्वाद रूपाने आज मंत्रीपद मिळाले आहे. त्याचा फायदा आपल्या मतदारसंघाला जास्तीत जास्त प्रमाणात करून देणार आहे. तसेच युवकांसाठी अहोरात्र काम करण्याची धमक माझ्यात निर्माण झाली असल्याचेही त्यांनी मनोगतात सांगितले. धानोरा येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विकास महाजन यांनी सत्कारावेळी मंत्री रक्षाताई खडसे यांचा साखरतुला करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांच्या समक्ष विधीवत पूजा करुन मंत्र पठण करत साखरतुला केली.

यांची होती उपस्थिती

यावेळी धानोरा तेली समाजातर्फे ‘साईमत’चे प्रतिनिधी प्रशांत चौधरी, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष रवी चौधरी, भाजपाचे शाखाध्यक्ष रवी टेलर, भूषण खेवलकर, भूषण चौधरी, सरपंच रज्जाक तडवी, उपसरपंच विजय चौधरी, सतपंथ मंदिराचे अध्यक्ष गजानन चौधरी, विकासोचे चेअरमन पंकज चौधरी, पीक सोसायटीचे चेअरमन पन्नालाल पाटील, दूध संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील, झि. तो. महाजन विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, विकास महाजन, जितेंद्र पाटील, सावंत महाजन, सुरेंद्र महाजन, माजी सभापती कल्पना पाटील, माजी उपसभापती माणिकचंद महाजन यांच्यासह धानोरा गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचलन देविदास महाजन तर आभार जितेंद्र पाटील यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here