Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»का. ऊ. कोल्हे विद्यालयात दहशतवादी घुसले
    क्राईम

    का. ऊ. कोल्हे विद्यालयात दहशतवादी घुसले

    SaimatBy SaimatAugust 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव

    शहरातील का. ऊ. कोल्हे विद्यालयात आज दुपारी तीन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्वरित कारवाई करीत एका दहशवाद्याला ठार केले. तर दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडल्याची कारवाई केली. यावेळी गोळीबार झाला. या अचानक झालेल्या चकमकीमुळे विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला.

    का. ऊ. कोल्हे शाळेत मंगळवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटाला तीन दहशतवादी घुसले. त्यांनी थेट आपला मोर्चा मुख्याध्यापिकांच्या दालनाकडे वळवला. यावेळी त्यांनी मुख्याध्यापिका गोसावी यांना ओलीस ठेवले. शाळेत दहशतवादी घुसल्याच्या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी क्यूआरटी फोर्स सोबत येऊन घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले असता, त्यांनी प्रत्युत्तरात गोळीबार केल्याने पोलिसांनीही गोळीबार केला. यात एक दहशतवादी मारला गेला. तर दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

    दरम्यान हे मॉक ड्रिल असल्याचे सर्वांना समजताच सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी पोलिसांचा ताफा पाहून काहीतरी विपरीत घडल्याचे समजून परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. या कारवाईबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे सांगून याची पूर्वकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिकांना दिली होती. तसेच सध्या कुठे काय होईल याचा नेम नसल्याने एखादा दहशतवादी हल्ला शाळेमध्ये झाल्यास अशा परिस्थितीला विद्यार्थी , शिक्षक, नागरिक आणि पोलीस कसे सामोरे जातात? याबाबत हे प्रात्यक्षिक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Varangaon : वरणगाव पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूलसह आरोपी ताब्यात

    March 15, 2026

    Amalner : अमळनेर हादरले! भरधाव डंपरने तरुणाला चिरले जागीच मृत्यू

    March 15, 2026

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.