जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना ईडीने अटक का केली?

0
13

मुंबई ः प्रतिनिधी

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई कार्यालयात दिवसभर झालेल्या चौकशीनंतर रात्री उशिरा ईडीने गोयल यांना अटक केली आहे. कॅनरा बँकेची ५३८ कोटींना फसवणूक केल्याप्रकरणी गोयल यांची चौकशी केली जात होती. याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात काय घडले?

जुलै महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध नव्याने आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या प्रकरणी मुंबई आणि दिल्लीतील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. छापेमारीच्या या कारवाई दरम्यान ईडीने काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती. आता नरेश गोयल यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

घोटाळा प्रकरण काय आहे?

नरेश गोयल यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा सीबीआयने ३ मे रोजी दाखल केलेल्या खटल्याच्या आधारावर करण्यात आला आहे. नरेश गोयल यांना आता न्यायालयात हजर करण्यात येईल. नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यासह अनेकजण कॅनरा बँक फसवणूक प्रकरणात आरोपी आहेत. जेट एअरवेज ही एकेकाळी भारतातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपन्यांपैकी एक होती. मात्र २०१९ मध्ये जेट एअरवेजने नगदी संकटाचा हवाला देत त्यांचे ऑपरेशन्स स्थगित केले होते.

फसवणुकीचे नेमके प्रकरण काय?

कॅनरा बँकेचे कर्जवसुली व कायदेशीर विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. संतोष यांनी २३ नोव्हेंबर २०२२ ला सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यात आरोपींनी फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, फौजदारी विश्वासघात, गुन्हेगारी नियमभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढय़ा रकमेचे बँकेचे नुकसान झाले होते. कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढय़ा रकमेचे बँकेचे नुकसान झाले. याबाबत बँकेकडून पडताळणी करण्यात आली असता बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याचे उघड झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अज्ञात सरकारी अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here