रावेरात रक्षा खडसेंच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार कोण ठरणार ?

0
15

साईमत, यावल : सुरेश पाटील

रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमानन खा.रक्षा खडसे यांच्या विरोधात कोणत्या राजकीय पक्षाकडून कोणता तुल्यबळ असा उमेदवार रिंगणात राहणार किंवा ठरणार? याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीतर्फे रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द होणार का? आणि तरुण तडफदार असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी मिळणार आहे किंवा नाही? आणि अमोल जावळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत का? आणि त्यांनी राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षात प्रवेश न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुल्यबळ असा कोणता उमेदवार खडसे कुटुंबीयांच्या विरोधात दिला जाणार? याबाबत संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या सून रक्षा खडसे यांची राजकीय सामाजिक घट्ट पकड आणि वर्चस्व आजही कायम आहे. त्यामुळेच इतर काही राजकीय पक्षाचे उमेदवार खडसे कुटुंबीयांच्या विरोधात तुल्यबळ अशा उमेदवाराच्या शोधात आहे. माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्या नावाची चर्चा असली तरी सामाजिक व राजकीय गणितामुळे त्यांना उमेदवारी द्यायची किंवा नाही याबाबत राष्ट्रवादीत विचार मंथन सुरू आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे कुटुंबीयांचा राजकीय, सामाजिक दबदबा लक्षात घेता तसेच लेवा, मराठा, गुजर आदी समाजासह इतर सामाजिक राजकीय गणित लक्षात घेता तुल्यबळ असा उमेदवाराचा शोध घेणे राजकीय दृष्ट्या सर्वस्तरात चर्चेचा विषय झाला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात लेवा कार्डालाच राजकीय दृष्ट्या महत्त्व असून सामाजिक गणित लक्षात घेता मतदारसंघातील या प्रमुख समाजासह इतर समाजाशी समन्वय साधणारा उमेदवार कोण तुल्यबळ व योग्य राहील, याबाबत राजकारणात विचार मंथन जोरदार सुरू आहे आणि ते चित्र येत्या चार-पाच दिवसात स्पष्ट होणार असल्याची सुद्धा संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघात चर्चिले जात आहे.

एकनाथराव खडसे यांची भाजपात पुन्हा घर वापसी होत असल्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात उघडपणे असणाऱ्या रुसव्या- फुगव्याची हवा, राजकीयदृष्ट्या असलेले गट-तट मतभेद साहजिकच कमी होणार असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे मात्र निश्‍चित आणि त्याचा लाभ राजकीय दृष्ट्या खडसे कुटुंबीयांनाच मिळणार यात संदेह नाही. रावेर लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा मागील राजकीय इतिहास लक्षात घेता मतदारसंघात भाजप, काँग्रेस किंवा अपक्ष हे आपले राजकीय गणित आपल्या सोयीनुसार सोडवून घेतात. कारण रावेर लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील जो कोणी विजयी उमेदवार असतो तो लोकसभेत आणि विधानसभेत एकमेव असा सामाजिक लोकप्रिय उमेदवार असतो आणि याच उद्देशाने आज सुद्धा मतदारसंघात आजी- माजी खासदार-आमदार राजकीय व सामाजिक दृष्ट्या तटस्थ भूमिका निभावत असल्याचे दिसून येत आहे. त्यांची कोणतीही प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमातून दिसून येत नाही. अशा राजकीय गणितामुळे आज तरी खडसे कुटुंबीयांना राजकीय पोषक असे वातावरण निर्माण झाल्याचेही चर्चिले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here