किनगाव बु.च्या महिला सरपंच राजीनामा केव्हा देणार..?

0
71

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील किनगाव बु. ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच निवड अडीच वर्षासाठी राहील. त्यानंतर इतर सदस्यांना सरपंच, उपसरपंच पद देण्यात येईल, असा शब्द माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी इतर सदस्यांना दिला होता आणि आहे. त्यानुसार उपसरपंच लूकमान तडवी यांनी ठरल्याप्रमाणे १२ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. परंतु ऑगस्ट २०२३ हा महिना संपत आल्यावरही किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत महिला सरपंच निर्मला संजय पाटील यांनी अद्यापही राजीनामा न दिल्याने किनगावात चर्चेला उधाण आले आहे. माजी आमदार रमेश चौधरी यांनी ग्रामपंचायत सदस्यांना दिलेला शब्द खरा ठरणार किंवा नाही..? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

किनगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार रमेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती. किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य निवडून आल्यानंतर सुरुवातीचे अडीच वर्ष महिला सरपंच पद म्हणून निर्मला संजय पाटील तसेच उपसरपंच म्हणून लूकमान तडवी यांना देण्याबाबत तसेच १२ ऑगस्ट २०२३ नंतर दीड वर्ष कालावधीसाठी सरपंच म्हणून भारती प्रशांत पाटील व उपसरपंच म्हणून आयनुर तडवी यांना देण्यात येईल, असा शब्द किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत व अंदाजे ४०० ते ५०० ग्रामस्थांच्या उपस्थितीत एका बैठकीमध्ये निश्चित करून सर्वांनुमते माजी आमदार रमेश चौधरी यांनी सदस्यांसह ग्रामस्थांना शब्द दिला होता. ठरल्याप्रमाणे विद्यमान महिला सरपंच निर्मला संजय पाटील यांनीही १२ ऑगस्ट २०२३ रोजी स्वतःहून राजीनामा देणे आवश्यक होता. परंतु त्यांनी ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत राजीनामा न दिल्यामुळे संपूर्ण किनगाव परिसरात आमदार रमेश चौधरी यांनी ग्रामस्थांसह सदस्यांना दिलेल्या शब्दाचे काय होणार..? आणि त्याचे विपरित परिणाम भविष्यात राजकारणात काय उमटणार..? याबाबत ग्रामस्थांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here