Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»तुम्ही तुरुंगात होता, तेव्हा काय झालं?
    राजकीय

    तुम्ही तुरुंगात होता, तेव्हा काय झालं?

    saimatBy saimatAugust 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवीदिल्ली ः

    मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भीडत आहेत. आता काही प्रमाणात दर उतरले आहेत मात्र मधल्या काळात टोमॅटोचा दर २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका होता. त्यामुळे टोमॅटो खाणे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेले होते. यावरून देशभर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. वाढत्या महागाईविरोधात आंदोलनेही झाली.

    दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने टोमॅटोच्या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारला असता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा टोमॅटोचा दर २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका झाला तेव्हा तुमच्या घरात यावर चर्चा होत होती का? असा प्रश्न विचारला असता स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला.

    त्यांनी टिव्ही पत्रकार सुधीर चौधरींना प्रतिप्रश्न केला, “सुधीरजी, तुम्ही जेव्हा तुरुंगात होता,तेव्हा काय झालं? असे मीही तुम्हाला विचारू शकते.” टोमॅटो दरवाढीवरून प्रश्न विचारणे हा खासगी प्रश्न आहे, असे ही स्मृती इराणी म्हणाल्या.

    या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.यावरून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पत्रकार सुधीर चौधरी हे ‘आज तक जी-२० समिट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलाखत घेत होते. यावेळी त्यांनी टोमॅटोच्या भाववाढीवरून प्रश्न उपस्थित केला असता इराणी यांनी संताप व्यक्त केला. या मुलाखतीमधील काही सेकंदाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    एका वृत्तानुसार, २०१२ मध्ये तत्कालीन ‘झी न्यूज’चे संपादक सुधीर चौधरी यांच्यासह ‘झी बिझनेस’चे संपादक समीर अहलूवालिया यांच्या लाचखोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना २० दिवस तुरुंगातही जावे लागले होते. काँग्रेसचे माजी खासदार आणि उद्योगपत्ती नवीन जिंदल यांच्या तक्रारीवरून सुधीर चौधरी आणि समीर अहलूवालिया यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. दोघांनी जिंदल कंपनीकडे १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणाचा संदर्भ देत, स्मृती इराणी यांनी सुधीर चौधरी यांच्यावर संताप व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.