साईमत भुसावळ प्रतिनिधी
शहरातील घरगुती वापराच्या गॅसची विक्री कशी होत आहे. गॅस धारकांना गॅस एजंसिज कश्या सुवीधा पुरवीतात, ग्राहकांच्या काही तक्रारी आहेत का ? आदी बाबी जाणून घेण्यासाठी भारत पेट्रोलीयमच्या अधिकाऱ्यांनी शहरातील गॅस एजंसिजला सदीच्छा भेट देत माहिती जाणून घेतली.
यावेळी भारत पेट्रोलियम चे मुख्यअधिकारी व्ही.नागराजन स्टेट हेड (महाराष्ट्र आणि गोवा राज्य) अधिकारी तसेच जळगाव एलपीजी टेरीटोरीचे मॅनेजर कमलेश कुमार , विक्री अधिकारी पवन भारती, अकोला येथील विक्री अधिकारी गौतम झा यांनी भुसावळातील धनश्री गॅस एजन्सीला नुकतीच भेट देत पाहणी केली.
यावेळी त्यांनी धनश्री गॅस एजन्सीचे संचालक रविंद्र शिंदे यांच्याशी चर्चा केली. व धनश्री गॅस एजंसीच्या भारत गॅस च्या सुरक्षा रथला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. तसेच ग्राहकांच्या सुरेक्षेबद्दल मार्गदर्शन केले.
त्यावेळी धनश्री गॅस एजन्सी चे संचालक रवींद्र शिंदे , व्यवस्थापक अनंत पाठक, संदीप बारपांडे, प्रशांत भारंबे, किशोर चौधरी, तुलसीदास झोपे, भास्कर वारके, सुरेश भवर, मुकुंदा सुरवाडे, भारत सुरवाडे, रवींद्र गायकवाड, प्रदीप सुरवाडे, गणेश शिंदे, कैलास बोडें, मोहन चौधरी,अतुल पाटिल, तुषार कोलते, गणेश महाजन आदी उपस्थित होते.