शिक्षणासाठी सामाजिक जबाबदारीची प्रेरणा
साईमत/पारोळा/ प्रतिनिधी
तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन श्री एंटरप्राइझेस, जळगाव यांनी केले असून, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली.
लोणी खुर्द येथील समाधान पाटील, रुपाली पाटील, नितीन पाटील आणि तेजस्वी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास लोणी खुर्दचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच समाधान पाटील, तसेच लोणी बु.चे सरपंच सहादू केदार, उपसरपंच शशिकांत पाटील, प्रशांत पाटील, ईश्वर पाटील, किरण पाटील, बंटी पाटील, मनोहर केदार, संतोष पाटील व सुनंदा पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी गरजू विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी सक्षम आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या घटकांनी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संदिप खैरनार यांनी केले, सूत्रसंचालन कविता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अनिल खैरनार यांनी मानले.हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक मदत पुरवण्यापुरताच मर्यादित न राहता, समाजातील जबाबदारी जपणाऱ्या नागरिकांनी शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, असा संदेश देणारा ठरला.
