साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भास्कराचार्य औद्योगिक प्रशिक्षिण संस्था तरवाडे येथे शैक्षणिक वर्ष २०२३ मधील प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्यावतीने सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या संचालिका जयश्री सूर्यवंशी, सौ.घाडगे, संस्थेचे सचिव आदित्य सूर्यवंशी, प्रवीण देवरे, शिवदास माळी, श्री.वाघ, श्री.ठाकरे, श्री.सूर्यवंशी, श्रीमती चौधरी यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सी.एस.महाजन यांनी केले.