‘हसत-खेळत गणित शिकूया’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी ‘मथ्स वीक’ शिक्षणावर भर देण्यात आला.
साईमत/पारोळा/ प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड, आत्मविश्वास व तार्किक विचारशक्ती विकसित व्हावी म्हणून गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त पारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आठवडाभर विविध गणितीय उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
हा उपक्रम स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील व संचालिका रुपाली पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.
त्यांनी उपक्रमाचे उद्घाटन करत, गणित हा केवळ विषय नसून जीवनातील महत्त्वाचा घटक असल्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. प्राचार्य पी.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणिताची भीती दूर करून विविध उपक्रमांतून आनंदाने गणित आत्मसात करण्याचे आवाहन केले. आठवडाभर गणितावर आधारीत शैक्षणिक गाणी, प्रेरणादायी चित्रपट, गणितीय खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘हसत-खेळत गणित शिकूया’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी ‘मथ्स वीक’ शिक्षणावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी मॅथ प्रात्यक्षिक अत्यंत आवडीने, कल्पकतेने व उत्कृष्टरित्या तयार करून सादर केले.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून, गणित अधिक सोपे, रंजक व उपयुक्त वाटू लागल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरला. यासाठी प्राचार्य पी.एस.पाटील, अजीम शेख, उपप्राचार्या कविता सूर्यवंशी, विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर, वृषाली पाटील, काजल सिंधी आदी शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
