साईमत जळगाव प्रतिनिधी
के.सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदीर येथे पालकांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सदर स्पर्धेत माता पालकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बेटी बचाओ बेटी पाढाओ …. , पर्यावरण वाचवा …, नेत्रदान श्रेष्ठ दान ..अशा विविध विषयांवर आधारित सुंदर अशा रांगोळ्या यावेळी काढल्या.
त्यात शीतल राहुल पोतदार (प्रथम ) ,अमृता विजय लोहार (द्वितीय) , भारती स्वप्नील गायकवाड (तृतीय) , अंजली अनिल चौधरी (उत्तेजनार्थ ), स्मिता विरेंद्रनाथ नागपुरे (उत्तेजनार्थ ) अशी निवड करण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध रांगोळीकार कुमुद नारखेडे यांनी केले तर मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.