साईमत जळगाव प्रतिनिधी
केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका दिपाली चौधरी तसेच कल्पना तायडे , मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कुमारी वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारून जिजाऊंची माहिती सादर केली, तर काव्या फेगडे या विद्यार्थिनींनी सुद्धा जिजाऊंच्या जीवन कार्याला उजाळा दिला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली तर काहींनी गीते सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन स्वाती पाटील, कायनात सय्यद, मंगल गोठवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.