साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाअंतर्गत, विद्यासमितीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रोशनी पुंडलिक गोपाळ हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. त्यात शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी ‘शिक्षण-व्यक्तिमत्व विकास’ हा निबंधाचा विषय देण्यात आलेला होता. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुलचे कलाशिक्षक व्ही.पी.जोशी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, श्री.काळे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी.एन.नरवाडे, पर्यवेक्षक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.