उपक्रमात मानवी साखळी, रांगोळी, पालक संकल्प पत्रांचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
मतदानाचा टक्का वाढावा त्या दृष्टिकोनातून शासनामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यातील एक म्हणजे शाळा महाविद्यालयांमधून जनजागृती हे लक्षात घेता प्रगती विद्यामंदिर, प्रगती माध्यमिक शाळेत मतदार जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. त्यात मानवी साखळी, रांगोळी, पालक संकल्प पत्र अशा उपक्रमांचा समावेश होता. मतदानाविषयी जनमानसात जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थांनी विविध रांगोळ्यामध्ये घोषणाचा वापर केला. “ ना जातीवर ना धर्मावर, मतदान करा कार्यावर” अशा विविध घोषणा होत्या. जनमानसात मतदानाविषयी जागृतता व्हावी, या हेतूने उपक्रम हाती घेतले. मतदान जनजागृतीपर उपक्रमासाठी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे, सचिव सचिन दुनाखे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मनीषा पाटील, संगीता गोहील, ज्योती कुलकर्णी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.