मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई महाविद्यालयात मतदार जागृती कार्यक्रम

0
46

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या स्वीप उपक्रम मतदार जनजागृती अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा मतदान आहे. भारतातील नागरिकांना तसेच नवमतदारांना मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने उपक्रम राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. अभियानातील १३ मे २०२४ रोजी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर ‘तारीख तेरा, मतदान मेरा’ ही घोषणा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये देण्याकरीता प्रशासनाने मार्गदर्शक सूचना केल्या.

संत मुक्ताबाई महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘तारीख तेरा, मतदान मेरा’ ही सर्वाधिक मतदान होण्याच्या दृष्टीने घोषणा देण्यात आल्या. या घोषणेदरम्यान उपस्थितांना संसदीय शासन प्रणाली, लोकशाहीत मतदानाचे महत्त्व राजकीय व्यवस्थेला भरभक्कम बनविण्याकरीता मतदान हेच एक प्रभावी माध्यम आहे. त्याचे महत्त्व प्रा. डॉ. रमेश शेवाळे यांनी विशद केले.

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनिमित्त शासन विविध स्तरावर मतदार जागृती अभियान राबवित आहे. विद्यार्थी, साहित्यिक, कलावंत, पथनाट्य, चित्रकला, रांगोळी, व्याख्याने, घोषवाक्य, परिसंवाद या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यात आपणही आपल्या पद्धतीने एक जबाबदार नागरिक म्हणून, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जनजागृती करणे गरजेचे आहे. लोकसभेची मतदान प्रक्रिया ही केवळ उमेदवार निवडीची प्रक्रिया नाही तर देशाला राजकीय स्थैर्य मिळवून देण्याची, लोकांचे राजकीय समाजीकरण करण्याची, राजकीय सहभागाची प्रगल्भ अशा प्रकारची प्रक्रिया आहे. त्यात आपण हिरीरीने भाग घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

स्वीप उपक्रम घेण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. वीरेंद्र जाधव, प्रा. अमर पाटील, डॉ. अजित कुलकर्णी, प्रा. रेवती फडणीस, प्रा. मंगेश मेतकर, प्रदीप पाटील, लीलाधर महाजन, चंद्रकांत विसाळे, प्रा.शुभम पाटील, प्रा. प्रकाश खिलारे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here