Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»विवरे ते भालगाव रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात करणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    विवरे ते भालगाव रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात करणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    विवरे ते भालगाव हा १० कोटींच्या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात करणार आहे. सभामंडप बांधकामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील विवरे, बोरगाव खु. येथे हरीनाम कीर्तन सप्ताहाच्या कार्यक्रमा प्रसंगी तसेच विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. दिवसभरात कासोदा, विवरे, बोरगाव येथे पालकमंत्र्यांनी दिवसभरात तीन ठिकाणी किर्तन श्रवण केले.

    धरणगाव तालुक्यातील विवरे येथे गावांतर्गत २५ लक्ष निधीतून पेव्हिंग ब्लॉक मंजूर आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच भवरखेडा व बोरगाव खु. येथे ११८ वर्ष्याची परंपरा असलेल्या हरीनाम कीर्तन सप्ताह ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन कीर्तन श्रवण केले. यावेळी बोरगाव येथे श्री विठ्ठल मंदिर परिसरात १० लाखाचे तर विवरे व भवरखेडा येथे ५० लाखाचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाविक भक्तांना आश्वासित केले.

    याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका संघटक रवींद्र चव्हाण, सरपंच भैय्या महाजन, उपसरपंच पिंटू पाटील, बोरगावचे सरपंच लक्ष्मण भील, किशोर मराठे, नितीन पाटील, समाधान मराठे, दिलीप महाजन, ह.भ.प. शशी महाराज, स्वप्नील पाटील यांच्यासह भाविक भक्त, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन युवासेनेचे भैय्या मराठे तर आभार उगलाल पाटील यांनी मानले.

    भवरखेडातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भवरखेडा येथील भील समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भगवे उपरणे देऊन त्यांचे स्वागत केले. नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत आहे. पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष संघटन वाढीसाठी कार्य करण्याचे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी भील समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बापू नाईक, रवींद्र निकम, बापू सोनवणे, ईश्वर मोहित, गोविंद मालचे, किशोर मोहित, सागर मालचे, उदय भील, विठ्ठल भील, देविदास भील, भाऊसाहेब भील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी घरकुल धारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भील वस्तीत श्री हनुमान मंदिर बांधकामासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहकार्य केले. याप्रसंगी शिवसेनेचे उगलाल पाटील, सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच धनराज पाटील, दिलीप पाटील, संघटक सतीश पाटील, शाखा प्रमुख रवींद्र भील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.