विठ्ठलनामाची शाळा भरली… : विद्यार्थ्यांकडून संतांच्या वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर

0
15
विठ्ठलनामाची शाळा भरली... विद्यार्थ्यांकडून संतांच्या वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर

साईमत ओझर प्रतिनिधी

वारकऱ्यांच्य वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठ्ठल नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात चांदोरी (ता.निफाड) येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा रंगला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी या पालखी सोहळ्याचे आकर्षण ठरले.एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान विद्यार्थी व विद्यार्थिनी मात्र पांढरा झब्बा हातात भगव्या पताका,डोक्यावर टोपी, कपाळी केशरी गंध,गळ्यात टाळ घेऊन आलेली मुले आणि नऊवारीत नटून थटुन,केसात गजरा,डोक्यावर तुळस आणि पाण्याचे हंडे घेऊन आलेल्या मुला आणि “शाळा शिकताना तहान भूक हरली,विठ्ठल नामाची शाळा भरली” या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन झालेले बाल वारकरी अवतरले.

हा नयनरम्य पालखी सोहळा संपन्न करण्यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रिया कंक्राळे,मेघा चव्हाणके,गायत्री
टर्ले,ज्योती सूर्यवंशी,दिप्ती विप्रदास, शितल टर्ले,अंजली सोनवणे,रजनी चव्हाण,माधुरी टर्ले,अश्विनी चौधरी,बालाजी बोरस्ते यांनी परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here