साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अमळनेर तालुक्यात असणाऱ्या श्रीराम मंदिरांना भेटी देऊन आरती, हनुमान चालीसा पठण केली. त्यामुळे ग्रामीण भागात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अमळनेर येथील राम मंदीर येथुन सकाळी कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
तालुक्यातील ढेकु, आर्डी, वावडे, एकलहरे, एकतास, तांदळी, कळमसरे, करणखेडा, नंदगाव, दहीवद, रामेश्वर, हेडावे येथुन अमळनेर येथे श्रीराम कॉलनीत माजी आ.स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीत विधान सभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, शहराध्यक्ष विजय राजपूत, सरचिटणीस गोकुळ परदेशी, प्रा. डॉ.जयंत पटवर्धन, किसान मोर्चाचे अध्यक्ष दीपक पवार, कोषाध्यक्ष अनिल लाड, उपाध्यक्ष सुभाष पाटील, दीपक पाटील, शिक्षक आघाडीचे प्रवीण पाटील, सदाशिव पाटील, परमेश्वर सैंदाणे, गणेश बडगुजर, युवा मोर्चोचे समाधान पाटील, निनाद जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यासाठी आर्डी येथील श्रीनिवास मोरे आणि अंतुर्लीचे सरपंच राहुल पाटील यांचे सहकार्य लाभले. त्यांनी रॅलीचा उत्साह वाढविला. जिल्ह्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेतल्यामुळे शहरातील कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.