अमळनेरला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला ‘नॅक पीअर’ची भेट

0
37

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (नॅक) नुकतीच भेट देऊन मूल्यांकन केले. दरम्यान, महाविद्यालयाला देण्यात आलेल्या ग्रेडविषयी माहिती कळविण्यात येणार असल्याचे नॅकच्या सदस्यांनी सांगितले. समितीच्या सदस्यांनी मूल्यांकनाचा अहवाल बंद पाकिटात महाविद्यालयाचे प्राचार्य ड़ॉ. पी.पी.चौधरी, स्टिअरिंग समितीचे समन्वयक डॉ.नयना वाणी यांच्याकडे सुपूर्द केला.

अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने समितीचे अध्यक्ष डॉ. अंबिका दत्त शर्मा, प्रा. डॉ. हरसिंग गौर विश्‍वविद्यालय सागर (म.प्र.), समन्वयक डॉ. सुधीर कुमार जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली, सदस्य प्राचार्य डॉ. सर्वनन थर्मलिनग्राम भारतीय कॉलेज ऑफ एज्युकेशन विलुपुरम तामिळनाडू आदी मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांना विजयनाना पाटील आर्मी स्कुलचे विद्यार्थी, सुभेदार व कमांडर यांनी स्वागत करून मानवंदना दिली. समितीच्या सदस्यांनी प्राचार्य व नॅक समन्वयक यांच्या सादरीकरणानंतर प्रत्येक कागदपत्रांची कसून तपासणी केली. तसेच विविध विभाग, अध्ययन प्रणाली, उपलब्ध सुविधा, संशोधन, प्रशासनाविषयी माहिती घेतली.

महाविद्यालयात आयोजित सांस्कृतिक, क्रीडा तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याविषयी माहितीचा आढावा घेतला. याप्रसंगी नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.विजय नवल पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी. पाटील, प्रा. शाम पवार, रुख्मिणीताई कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख, नवलनगर कला महाविद्यालय येथील प्रा. डॉ. गांगुर्डे, उमेश काटे यांनी मार्गदर्शन केले. नॅक समितीचे चेअरमन, सदस्य यांनी विद्यार्थी, माजी विद्याथी, पालक, प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संवाद साधला. ग्रामीण भागात महाविद्यालयासाठी येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन केल़े तसेच उपक्रमाविषयी महाविद्यालयाचे कौतुक केले.

महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी चाललेल्या नॅकच्या प्रक्रियेत मदत करणारे मार्गदर्शक मेंट्रोर प्रा.डॉ.जयेश गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्रा. डॉ. एन.के.वाणी, प्रा. डॉ. एन जी. पाचपांडे, प्रा.डॉ.ए.के. जोशी, प्रा.डॉ.जे. एन चव्हाण. प्रा. यु. बी. पाटील, प्रा. डॉ. एस. सी.तायडे, प्रा. के.वा.देवरे यांनी सात निकषांचा सखोल अभ्यास करून आवश्‍यक माहिती संकलित करून नॅक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. तसेच कार्यालयीन कर्मचारी अनिकेत सूर्यवंशी, किरण रावळ, गिरीश पाटील, राजेंद्र वाघ, विनोद सोनवणे, सोपान पाटील, जितेंद्र पाटील, चेतन थोरात यांनी सहकार्य केले. आर्मी स्कुलचे प्राचार्य प्रभाकर कोळी, सुनील महाले, व्ही.डी.पाटील, अनिल पाटील, शरद पाटील, प्रेमराज सूर्यवंशी, मिलिंद बोरसे, दुर्गेश वैद्य, किरण बाविस्कर यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, बीएड कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here