साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मोताळा प्रेस टाइम्स आणि फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोताळा येथे निदर्शने करून निषेध नोंदविला आहे. यावेळी तहसिलदारांमार्फत राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. मोताळा प्रेस टाइम्स तसेच फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा जोपासणारे विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दंडांवर काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध नोंदविला. यावेळी मोताळा बस स्थानक चौकात निदर्शने करण्यात आली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदनावर मोताळा प्रेस टाइम्सचे अध्यक्ष सँडी मेढे, काँग्रेसचे नेते गजानन मामलकर, ‘समतेचे निळे वादळ’ मोताळाचे तालुकाध्यक्ष अरुण डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष डॉ.शरद काळे, वंचित जिल्हा नेते प्रशांत वाघोदे, जगन उमाळे, सुधाकर बोरसे, अनिल खराटे, कैलास खराटे, सादिक शेख, शाहीद कुरेशी, अमर कुळे, वैभव वानखेडे, वसंत जगताप, तुळशीराम नाईक, मिलिंद अहिरे, जितु खराटे, रोशन गायकवाड, अमोल डोंगरे, सतीश नरवाडे, महेंद्र मेढे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.