Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Bhusawal : भुसावळ न्यायालयाबाहेर महिलेकडून गावठी कट्टा जप्त
    क्राईम

    Bhusawal : भुसावळ न्यायालयाबाहेर महिलेकडून गावठी कट्टा जप्त

    saimatBy saimatJanuary 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Bhusawal: Village knife seized from woman outside Bhusawal court
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    न्यायालयाबाहेरील संशयास्पद महिलेकडून गावठी कट्टा सापडला

    साईमत /भुसावळ /प्रतिनिधी :

    जळगाव जिल्ह्यात चोरीछुप्या पद्धतीने गावठी कट्टे (देशी बनावटीची शस्त्रे) बाळगण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून, या बेकायदेशीर शस्त्रांमुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून नियमित कारवाया सुरू आहेत. अशातच भुसावळ शहरातील न्यायालयाबाहेरील सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या एका महिलेकडून पोलिसांनी गावठी कट्टा जप्त केला आहे.

    भुसावळ शहर पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, न्यायालयाबाहेरील भुसावळ–यावल मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर एक महिला संशयास्पद अवस्थेत उभी असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून तपासणी केली, त्यावेळी महिलेकडून गावठी कट्टा आढळून आला.

    संबंधित महिलेचे नाव सुभमा अशोक धामणे (वय ३२, रा. तापीनगर, एमआयडीसी ऑफिससमोर, प्लॉट नं. ३, भुसावळ) असून, तिच्याकडील मोटारसायकलचीही झडती घेतली गेली. तपासादरम्यान अंदाजे २० हजार रुपयांचा गावठी कट्टा व सुमारे ६० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल दीपाली रामलखन यादव यांनी फिर्याद दिली असून, संबंधित महिलेविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

    पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही संशयास्पद व्यक्तीकडे बेकायदेशीर शस्त्रे असल्यास तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.