ग.स.सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी निवड
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि., जळगाव (ग.स.सोसायटी) च्या स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल विजय दगा पाटील यांचा चाळीसगाव येथील समृध्दी शिक्षक फाउंडेशनतर्फे शाल, पुष्पहार व ‘सेल्फी विथ सक्सेस’ पुस्तक देवून नुकताच सत्कार केला.
याप्रसंगी समृध्दी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सतीष साहेबराव सूर्यवंशी, सहसचिव महेंद्र पवार, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे, ज्येष्ठ संचालक जामराव पाटील, शिवापूर जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक सदाशिव पाटील उपस्थित होते.