साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथून जवळच असलेल्या एरंडोल तालुक्यातील सावदा येथे पाळधी पोलिसांनी नाल्यालगत गावठी दारू तयार केली जात होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी धाड टाकली. धाडीत १७ हजार रुपये किमतीच्या साहित्यासह गावठी दारू ताब्यात घेतली. यावेळी तेथे तयार होत असलेली गावठी दारू तेथील नाल्यातच तात्काळ नष्ट करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी जितेश नाईक यांच्या फिर्यादीनुसार दादू उर्फ राजू गटलू मालचे (रा. सावदा, ता.एरंडोल) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो. नि. सचिन शिरसाठ यांचा मार्गदर्शनाखाली विजय चौधरी, विठ्ठल पाटील करीत आहेत.