भुसावळ रनर्सची नाशिकच्या ‘ब्रह्मगिरी’वर विजयी पताका

0
19

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर ‘रनबडीज’ कंपनीतर्फे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. त्यात भुसावळ स्पोर्ट्‌स अँड रनर्स असोसिएशनच्या तब्बल ६५ धावपटूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत उमेश घुले प्रथम ठरले. त्यांनी ब्रह्मगिरी परिक्रमा २२ कि.मी. अंतर केवळ २ तासात धावून पूर्ण केले. त्याचबरोबर सुनिता सिंग यांनी महिला गटात १० कि.मी.च्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. दोघं धावपटूंचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व धावपटूंनी एकच जल्लोष केला. याशिवाय भुसावळ स्पोर्ट्‌स अँड रनर्स असोसिएशनच्या तब्बल ६५ धावपटूंच्या सहभागामुळे ही संपूर्ण स्पर्धा भुसावळमय झाली होती. त्यामुळे असोसिएशनचा आयोजकांनी सत्कार केला. प्रवीण पाटील यांनी हा सत्कार स्वीकारला.

ही स्पर्धा २२ कि.मी., १५ कि.मी., १० कि.मी., ५ कि.मी. व ३ कि.मी. या वेगवेगळ्या गटात आयोजित केली होती. डोंगरावर अतिशय उंच सखल रस्त्यावर व काही ठिकाणी १५० ते २०० पायऱ्या चढून उतरून ही स्पर्धा पूर्ण करणे प्रत्येक धावपटूसाठी आव्हान असते. परंतु २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे संपूर्ण निसर्ग हिरव्या गालिचाने आच्छादित झाल्यासारखा वाटत होता. शिवाय सततच्या पावसामुळे डोंगरावरील धबधबे व झरे प्रवाहित झाल्यामुळे एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रसंग असावा असे चित्र सर्व धावपटू अनुभवत होते. आजूबाजूच्या भाताची शेती व हिरवा डोंगर बघत भुसावळचे धावपटू धावत होते. त्यावेळी स्वयंसेवक व रस्त्यावरील प्रवासी भुसावळ रनर्सचा अधिकृत तिरंगी टी-शर्ट बघून भुसावळहून आलात का अशी आस्थेवाईक चौकशी करून विशेष कौतुक करत होते.

स्पर्धेत सरला व महेंद्र पाटील, पुष्पा व प्रशांत वंजारी, सविता व राजेंद्र घारे, आरती व सारंग चौधरी, जयश्री व जितेंद्र चौधरी या दाम्पत्यांच्या जोडीने तब्बल २२ कि.मी. धावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पूनम भंगाळे, रणजीत खरारे, प्रवीण वारके, संघटनेच्या जुन्या धावपटूंसोबतच स्वाती भोळे, मंगला पाटील, संगीता चौधरी, माधुरी गव्हाळे, सुनिता पाटील, माया पवार, ज्योती सिंग, कीर्ती मोटाळकर, अर्चना चौधरी, माधुरी चौधरी, डॉ.वर्षा वाडीले, दीपा स्वामी या नवोदित महिला धावपटूंनीही २२ कि.मी. धावून परिक्रमा पूर्ण केली. याबरोबरच ॲड. मोहन देशपांडे, विलास पाटील, संतोष मोटवानी, सुरेश साहनी, इसाक गवळी, रमेश पाटील, डॉ. उमाकांत चौधरी, मंगेश चंदन या पुरुष धावपटूंनी २२ कि.मी.च्या स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला.

४२ धावपटूंचा २२ कि.मी. स्पर्धेत सहभाग
स्पर्धेत प्रमोद शुक्ला, सुभाष चौधरी, मंजू शुक्ला, विनीता शुक्ला, पुष्पा चौधरी, सुनीता वाघमारे, प्रदीप माळी, एकता भगत, मनीषा सिंग, आराधना तांबे, गुड्डी देवी या धावपटूंनी १० कि.मी.मध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. ६५ पैकी तब्बल ४२ धावपटूंनी २२ कि.मी. स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यात तब्बल ३० महिला धावपटू होत्या. यशाबद्दल भुसावळ स्पोर्ट्‌स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. प्रवीण फालक यांनी सर्व धावपटूंचे विशेष कौतुक करुन आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here