साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीवर प्रताप महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील कायम प्राध्यापकांमधून दरवर्षी एका प्राध्यापकाची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात येते. परंतु यावर्षी निवडणुकीसाठी एकमत न झाल्याने उपप्राचार्य प्रा. पराग पाटील आणि प्रा.डॉ. विजय तुंटे यांच्यात चुरशीची लढत झाली. चुरशीच्या लढाईत प्रा.पराग पाटील यांचा विजय झाला. निवड जाहीर झाल्यानंतर त्यांना निवडीचे पत्र महाविद्यालयाचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए. बी. जैन आणि निवडणूक निर्णय अधिकारी उपप्राचार्य प्रा. डॉ.जी.एच.निकुंभ यांनी दिले.
निवडणुकीसाठी स्थानिक निवड समितीचे सदस्य उपप्राचार्य प्रा.डॉ.जे.बी. पटवर्धन, प्रा.डॉ.नलिनी पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.यु.जी.मोरे, डी.बी. कांबळे, जे.एन.पाटील यांनी काम पाहिले. निवडणुकीच्या कामी राकेश निळे, भटू चौधरी, विजय ठाकरे, अजय साटोटे, उमाकांत ठाकूर यांचे सहकार्य लाभले. प्रा.पराग पाटील यांच्या निवडीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्याध्यक्ष, कार्य उपाध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.