निमखेडीतील महानुभाव वैकुंठधामात रविवारी होणार अंत्यविधी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळ्यातील बाजार रस्ता, लिमडी शाळेसमोरील रहिवासी तथा सुवर्णकार (सोनार) समाजातील ज्येष्ठ समाजसेवक, समाजाच्या हितासाठी सदैव झटणारे वासुदेव नारायण पोतदार (रा.तळईकर) यांचे वयाच्या ९९व्यावर्षी शनिवारी, ७ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी, ८ जून सकाळी १० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ते महानुभाव अनुयायी असल्यामुळे त्यांचा अंत्यविधी निमखेडी येथील महानुभाव स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दिनकर, सुरेश आणि रमेश वासुदेव पोतदार अशी तीन मुले तर सुशीला सोमनाथ विसपुते, मंगल अनिल सोनवणे अशा दोन मुली तसेच नातवंडे, पणतु असा परिवार आहे. वासुदेव पोतदार यांनी चाळीसगाव तालुक्यात सर्कल ऑफिसर म्हणून आपली सेवा बजावली होती. ते जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.नितीन विसपुते यांचे आजोबा होत.