नेरीला प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर

0
63

जामनेर तालुक्यात दर आठवड्याला होणार शिबिर

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुका आरोग्य विभागाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शिबिरात दोन मुलींवर एक तर तीन शस्त्रक्रिया दोन अपत्य असलेल्या पुरुषांवर करण्यात आल्या. पत्नीस आरोग्याच्या दृष्टीने त्रास नको म्हणून पुरुषांनी स्वतःवर शस्त्रक्रिया करून घेतली. यापुढे दर आठवड्याला पुरुष नसबंदी शिबिर घेणार असल्याचे डॉ.धापते यांनी सांगितले.

पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते यांच्याकडून शस्त्रक्रिया केलेल्यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यशस्वीतेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले, डॉ.दानिश खान, डॉ.किरण पाटील, तालुका पर्यवेक्षक बशीर पिंजारी, राजेंद्र कुमावत, आरोग्य सहाय्यक दिनकर माळी, विक्रम राजपूत, सोपान राठोड, सुनील बोरसे, किशोर पाटील, रवींद्र सूर्यवंशी, स्वप्निल महाजन यांच्यासह नेरीतील प्रा.आ.केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here