Leva Paatidar Mahasangh : न्हावीला लेवा पाटीदार महासंघाच्या सभेत विविध विषयांवर चर्चा

0
9

समाजातील विवाहाच्या आदर्श आचारसंहितेवर विचार विनिमय

साईमत/न्हावी, ता.यावल/प्रतिनिधी : 

येथील जे.टी.महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीत महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाची तालुकास्तरीय सभा नुकतीच घेण्यात आली. सभेत लेवा पाटीदार समाजातील विवाहाची आदर्श आचारसंहितेवर सखोल विचार विनिमय करण्यात आला. सुरुवातीला स्व. दादासाहेब जे.टी.महाजन (माजी गृह राज्यमंत्री) यांच्या अर्धाकृती पुतळ्याला, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आला. सभेच्या व्यासपीठावर अरुण बोरोले, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, पुणेतील पिंपळे सौदागर लेवा भ्रातृमंडळाचे अध्यक्ष विकास वारके, उपाध्यक्ष दिलीप चौधरी, कृष्णा खडसे, नाशिकचे डॉ.प्रमोद महाजन, इंडिला ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विजय महाजन, प्रा. व. पू. होले, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, साधना लोखंडे, नीता वराडे, रामानंद वारके, उल्हास चौधरी, प्रवीण वारके, नरेंद्र कोल्हे, भोरगाव लेवा पंचायतचे सदस्य, त्यांचे ३ सहकारी, नीता वराडे, साधना लोखंडे, संगीता भोळे, नीलिमा राणे आदी उपस्थित होते.

सभेत कृष्णा खडसे यांनी लेवा पाटीदार समाजातील विवाहाची आदर्श आचारसंहिताबाबत मार्गदर्शन करून संहितेतील २७ नियमांचे वाचन केले. त्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचा सर्वांनी संकल्प करावा. त्यादृष्टीने सर्वांकडून शपथ दिली. त्यानंतर शरद महाजन यांनी समाज कार्य करताना कोणती काळजी घ्यावी, याबद्दल उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यांनीही व्यक्त केले मनोगत

तरुणांचा सहभाग समाज कार्यात वाढावा, यासाठी डॉ. प्रमोद महाजन यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. कथाकथनकार तथा साहित्यिक प्रा. व.पु.होले यांनी लग्नातील डीजे यासंबंधी वाईट गोष्टींचा परिणाम कसा होतो, याविषयी मार्गदर्शन करुन लग्नात डीजे वाजवू नये, असे आवाहन केले. नरेंद्र नारखेडे यांनी अनुपालन समित्या गावपातळीवर आणि तालुका पातळीवर नेमण्याची गरज अधोरेखित केली. मुलींनी कसे वागावे हे सांगून, ताण-तणाव किंवा टेन्शन कशा प्रकारे दूर करता येईल, याविषयी नीता वराडे यांनी मार्गदर्शन केले. विकास वारके यांनी शेतकऱ्यांसाठी सुरक्षा व व्यवस्थापन ॲप विकसित करण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. मिलिंद पाटील यांनी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघास बळकट करण्यासाठी सर्वांनी महासंघाशी जोडून घ्यावे, असे आवाहन केले. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन राकेश फेगडे, नंदकिशोर पाटील, दिलीप चौधरी यांनी केले.

यांची होती उपस्थिती

सभेला भोरगाव पंचायतचे नरेंद्र कोल्हे, त्यांचे तीन सहकारी, तालुका भरातून जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, सरपंच देवेंद्र चोपडे, उल्हास चौधरी, दीपक चौधरी, नारायण चौधरी, हर्षल पाटील, राकेश फेगडे, नितीन व्यंकट चौधरी, बाळू फेगडे, अमोल भिरुड, उमेश पाटील, प्रभाकर सरोदे, के.टी.तळले, आरती महाजन, भारती चौधरी, पौर्णिमा पाटील, योगराज बऱ्हाटे, जितेंद्र खाचणे, डोंगर चौधरी, राजू महाजन, चंद्रकांत चौधरी, युवराज चौधरी, हर्षल जावळे, संजय सराफ, किरण चौधरी, पप्पू चौधरी, पिंटू राणे, बबलू महाजन, युवराज सरोदे यांच्यासह तालुकाभरातून समाज बांधव, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेची सांगता साधना लोखंडे यांनी ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगान गाऊन केली. प्रास्ताविक महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले तर सूत्रसंचालन तथा आभार प्रा.डॉ.के.जी.पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here