किशोर महोत्सवाअंतर्गत सुमधुर गायनासह आकर्षक नृत्य सादर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात किशोर महोत्सवाअंतर्गत ‘विविध गुणदर्शन’ हा विद्यार्थ्यांचा आवडता कार्यक्रम नुकताच जल्लोषात पार पडला. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त व प्रमुख समन्वयिका पद्मजा अत्रे, सहसचिवा मीरा गाडगीळ, मुख्याध्यापक सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, सांस्कृतिक प्रमुख सुवर्णा वंजारी, उपप्रमुख स्मिता करे, विविध गुणदर्शन समिती प्रमुख पांडुरंग सोनवणे, संपदा तुंबडे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, गोंधळ, सिनेगीत, भक्तीगीत, भावगीते यांचे सुमधुर गायन तसेच आकर्षक नृत्य सादर केले. डफ, बासरी व संबळ वाद्यांचे वादनही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. विद्यार्थ्यांना संपदा छापेकर यांचे मार्गदर्शन लाभले तर पांडुरंग सोनवणे, उल्हास ठाकरे, रुद्र सोनवणे, आकुब खान व दुर्गेश सराफ यांनी साथसंगत केली. स्पर्धेत सुमारे ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नृत्य, गायन व वादन अशा विविध कला प्रकारांचे मनमोहक सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेचे परीक्षण सोमनाथ महाजन, रेखा पाटील यांनी केले. सहभागी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मान्यवरांसह शालेय पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी समिती सदस्य आनंद चौधरी, प्राजक्ता गोहिल, योगिता तडवी, मयूर पाटील, कविता कुऱ्हाडे, हिम्मत काळे, पंकज महाले, श्रीकांत घुगे यांच्यासह इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक समिती प्रमुख पांडुरंग सोनवणे, सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका पद्मजा जोशी, विद्यार्थी राम देशमुख, सार्थक पाटील तर आभार संपदा तुंबडे यांनी मानले.
