Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»चोपडा महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात
    क्रीडा

    चोपडा महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात १८ ऑक्टोबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागाच्या आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस -मुले व मुली, वेटलिफ्टिंग-मुले व मुली, पॉवर लिफ्टींग- मुले व मुली आणि बॉडीबिल्डिंग- मुले आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. सर्व स्पर्धांसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी एरंडोल विभाग क्रीडा समितीचे सचिव, पंकज महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले.

    याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, अभियांत्रिकी महाविद्यालय भांबोरीचे क्रीडा संचालक प्रा.जे.बी.सिसोदिया, एस.एस.पाटील बी.फार्मसी चोपडा महाविद्यालयाचे प्रा.रोहित चौधरी, पाळधी येथील त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जिमखाना विभागाचे समन्वयक प्रा. एम.जी.पाटील, प्रा.डॉ. के. एन सोनवणे, डॉ. सी.आर.देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

    टेबल-टेनिस स्पर्धेत चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयाचे मुले आणि मुली हे दोन्ही संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाले. बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मुले आणि मुली दोन्ही संघ उपविजयी झाले. तसेच वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि बॉडीबिल्डिंग स्पर्धांचेही यशस्वीपणे आयोजन केले होते. स्पर्धांमध्ये विविध वजन गटांमध्ये दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयाचे पॉवर लिफ्टिंग व वेटलिफ्टींग असे दोन्ही संघ विजयी झाले तर भडंग येथील सौ.र.ना. देशमुख महाविद्यालयाचे दोन्हीं संघ उपविजयी झाले. स्पर्धांसाठी पंच म्हणून कुणाल गोयर, किशोर महाजन तसेच बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी पंच म्हणून सुधाकर बाविस्कर यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी आर.एच.पाटील, सुधाकर बाविस्कर, विजय शुक्ल यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026

    Chopda:चोपड्यात घरासमोर गाडी लावण्यावरून हाणामारी

    February 20, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.