नवापुरला गोकुळाष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

0
4

साईमत, नवापूर : प्रतिनिधी

शहरात गोकुळाष्टमीनिमित्त जुनी महादेव मंदिर गल्लीतील जगन्नाथ महादेव मंदिराच्या प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन जय श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव समितीतर्फे केले आहे. समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर चौधरी, उपाध्यक्षपदी सचिन ब्रम्हे यांची निवड केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी, भजन कीर्तन, रास गरबा, दहीहंडी गोविंदा पथक मिरवणुकीसह सजीव देखावा साकारण्यात येणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यंदाच्या उत्सवासाठी श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव समितीच्या उर्वरित कार्यकारिणीत सचिव राहुल सेन, सहसचिव जयेश पाटील, खजिनदार डॉ.सुनील पवार, सदस्यांमध्ये दर्शन पाटील, भाविन पाटील, तुषार पाटील, प्रदीप मावची, मुकेश धोडिया यांचा समावेश आहे. तसेच सल्लागार मंडळीची सर्वानुमते निवड केली आहे.

गोविंद पथकामार्फत गुरुवारी दहीहंडीचा कार्यक्रम

कार्यक्रमाची रुपरेषा अशी गुरुवारी, ७ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ६ वा. श्रीकृष्ण मंदिर सरदार चौक ते श्री जगन्नाथ महादेव मंदिर, जुनी महादेव गल्लीपर्यंत श्रीकृष्ण पालखी रथ व गोविंदा मिरवणूक तसेच सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोविंद पथकामार्फत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here