साईमत शेंदुर्णी प्रतिनिधी
जामनेर (Jamner) तालुक्यातील शेंदुर्णी येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. सकाळी माळी समाज मंगल कार्यालय येथे गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व समाज बांधव यांच्या हस्ते संत सावता महाराज यांच्या मुर्तीला अभिषेक प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. व गावातील समाज बांधव व महिला मंडळाची उपस्थिती लक्षनीय होती.
तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी निमित्त माळी समाज मंगल कार्यालयात ह.भ.प.अमृत महाराज गाढे बेटावदकर यांचे सुश्राव्य किर्तन झाले. त्यांना साथसंगत वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी यांनी केली.
यावेळी शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, पोलीस निरीक्षक सचिन सानप तसेच नगरसेवक नगरसेविका, गावातील विविध पक्षांचे नेते,पदाधिकारी मान्यवर नागरिक समाज बांधव यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी शेंदुर्णी शहर माळी समाजाचे अध्यक्ष ह.भ.प.कडोबा महाराज माळी तसेच त्र्यंबक माळी,हरिभाऊ माळी,रघुनाथ माळी, हिरालाल माळी तसेच समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.