साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील हिरूभाई हिमाभाई पटेल प्राथमिक विद्यालय आणि अन्नपूर्णाबाई पाटसकर बालक मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी शाळेचे चेअरमन तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक बागड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केले. यावेळी बालमित्रांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
बालक मंदिर ते चवथीच्या विद्यार्थ्यांनी भाषण व देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच शाळेचे उपशिक्षक योगेंद्र राजपूत यांनी तंबाखू मुक्तीविषयी शपथचे वाचन केले. प्रभा नवले यांनी बालमित्रांकडून पिरॅमिडची प्रात्यक्षिके सादर केली. संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राहुल पाटील यांनी फलक लेखन केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन स्नेहल देशमुख तर गोरख बत्तीशे यांनी आभार मानले.