Grain Merchant Association : यावलला स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या मेळाव्यात विविध अडचणीवर चर्चा

0
9

जगातले चांगले सत्कर्म : मेळाव्यात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे प्रतिपादन

साईमत/यावल/प्रतिनिधी : 

येथील बोरावल गेटजवळील पद्मावती हॉलमध्ये जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा जिल्हा मेळावा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला. स्वस्त धान्यापासून गरजू लाभार्थी वंचित राहिला नको, असे शासनाचे ध्येय उद्दिष्ट आहे. शासनातर्फे स्वस्त धान्य दुकानदार दर महिन्याला जे धान्य वाटप करतात, ते काम म्हणजे जगातले चांगले सत्कर्म असल्याचे यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले. उपस्थित धान्य दुकानदारांचे उत्कृष्ट कार्य असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांच्या विविध अडीअडचणीही समजून घेतल्या. तसेच पुरवठा विभागही स्वतंत्र वेगळी यंत्रणा असली तरी अनेक लाभार्थ्यांच्या काही तक्रारी तहसीलदार म्हणून कार्यालयाकडे येत असतात. त्याबाबत पुरवठा विभागाला वेळोवेळी सूचना केल्या जातात, अशी माहितीही त्यांनी दिली.

मेळाव्यात राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पदाधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडीअडचणी, समस्या याबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन वाढवून ते कमिशन दर महिन्याला नियमित स्वस्त धान्य दुकानदारांना दिले. त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडीअडचणी निरसन करण्यासाठी दुकानदारांचे संघटन फार आवश्यक आहे, असा एक सूर संघटनेच्या मेळाव्यातून निघाला. मेळाव्यात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक अडचणीबाबत मार्गदर्शन केले.

मेळाव्यात यांची होती उपस्थिती

मेळाव्याला राज्याध्यक्ष डी.एन.पाटील, राज्य उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत यादव यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावल तालुक्यातील मुख्य आयोजक तथा अध्यक्ष सुनील नेवे, उपाध्यक्ष शेख अब्दुल्ला शेख रसूल, सचिव दिलीप मोरे, तालुका कार्याध्यक्ष अजय कुचेकर, सल्लागार नामदेव झुरकाडे, नितीन माहुरकर, दिलीप नेवे, अमृत पाटील, रतन कोळी यांच्यासह पदाधिकारी व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. मेळाव्यात दुकानदारांच्या सर्व मागणीचे व पुढील रूपरेषा ठरविण्यात आली. आगामी काळात दुकानदारांच्या मागणीसाठी मोठा मेळावा आयोजित करण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here