Castribe Employees : जळगावात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, शाखांच्या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा

0
7

अजिंठा विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, अनेकांनी केले मार्गदर्शन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील अजिंठा विश्रामगृहात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तसेच सर्व संलग्नित शाखांची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे होते. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने दहावी, बारावीमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या कास्ट्राईब परिवारातील गुणवंत पाल्यांचा सत्कार, गुणगौरव सोहळा आयोजित करणे, संघटनेच्या विस्तारासाठी जास्तीत जास्त सभासद करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अशा व इतर विषयांचा समावेश होता.

बैठकीला नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, पुलकेशी केदार (जिल्हाध्यक्ष), ज्येष्ठ सल्लागार राजेंद्र राणे, डी.एच.भास्कर, किशोर साळुंखे, राजीव वानखेडे, श्री.भालेराव (जिल्हाध्यक्ष, मनपा), नंदू गायकवाड, विकास सोनवणे, नितीन सोनवणे (जळगाव तालुकाध्यक्ष), जिभाऊ हटकर, विनोद सपकाळे (जिल्हा उपाध्यक्ष), योगेश अडकमोल, गोपीचंद भालेराव, कौतिक इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here