महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सोयगाव तालुक्यातील विविध कार्यकारिणी जाहीर

0
29
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सोयगाव तालुक्यातील विविध कार्यकारिणी जाहीर

साईमत सोयगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने काल (शनिवार) सोयगाव शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधवांची बैठक जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली श्री मारोती मंदिर सभागृहात पार पडली .
या बैठकीमध्ये उपस्थित सर्व नाभिक बांधवांच्या सर्वानुमताने महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या खालील कार्यकारिणी जाहीर केल्या आहेत .

तालुका शाखा
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष म्हणून केदार राऊत (गोंदेगाव), उपाध्यक्ष – बापुराव पंडित (सोयगाव),राजु गलबले (सावळदबारा),सचिव – अशोकराव वाघ , सहसचिव – ज्ञानेश्वर एलिस (सोयगाव) सह दिलीप सोनवणे ,किरण निकम ,दत्तात्रय एलिस,पवन क्षीरसागर ,विशाल सोनवणे v दिनेश सोनवणे आदींचा समावेश आहे .

युवक तालुका शाखा
अध्यक्ष – रामकृष्ण सोनवणे (सावळदबारा), उपाध्यक्ष – योगेश निकम (बनोटी), जगदीश एलिस (सोयगाव), सचिव – गणेश नेरपगारे (सोयगाव), सहसचिव – सागर ठाकरे (पोहरी) यांच्यासह भगवान पंडित ,महादू सोनवणे ,ललित पंडित ,अनिल झुंजारराव व सागर पंडित आंदीचा समावेश आहे .

सोयगाव शहर शाखा
अध्यक्षपदी नितीन सोनवणे (सोयगाव),उपाध्यक्ष म्हणून देवेंद्र पंडित आणि सचिव म्हणून महेश एलिस यांची निवड करण्यात आली.
या निवडीसाठी निरीक्षक म्हणून रत्नाकर बिडवे , राजेंद्र सुरडकर , पंडित बोर्डे आणि नागेश राऊत यांनी काम पाहिले . यावेळी सोयगाव , बनोटी आणि सावळदबारा जिल्हा परिषद सर्कलमधील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here