सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, संविधान उद्देशिका पाठांतर, लेखन उपक्रमांचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील साने गुरुजी कॉलनीतील स्थित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधानाचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.निकम होते. याप्रसंगी शाळेत सर्वांनी संविधानाची शपथ घेतली.
यावेळी निखिल नेमाडे, ज्येष्ठ शिक्षक संजय बाविस्कर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.पी. निकम यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, महत्त्व तसेच उद्देशिकेचे विश्लेषण केले. यावेळी संविधान दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, संविधान उद्देशिका पाठांतर, लेखन असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक जे. एस.चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील, अशोक पारधे, भारत गोरे, टी.टी. चौधरी, वैशाली बाविस्कर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तथा आभार आर.डी. कोळी यांनी मानले.