साईमत, जळगाव : प्रतिनिधी
पर्युषण पर्व सणाच्या पूर्णत्वाच्यानिमित्त दरवर्षाच्या परंपरेनुसार जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे जलकलशासह वरघोडा मिरवणुकीचे रविवारी, २४ सप्टेंबर रोजी आयोजन केले होते. त्यात धर्मप्रेमी, लहान मोठ्या सर्व स्तरातील समाजबांधवांनी सहभाग घेतला होता.
शहरातील विविध जैन मंदिरात तसेच गृह जैन मंदिरात अष्टप्रकारी पूजेची थाळी अर्पण करून चैत्यवंदन करण्यात आले. शेवटी कोठारी मंगल कार्यालयात स्वामीवात्सल अर्थात जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याचा समाजबांधवांनी लाभ घेतला.