दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील तापमानाच्या वरणगावकरांना झळा

0
11

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील बॉयलरमधून निघणारे तापमान व प्रदूषणामुळे वरणगाव शहराचे सर्वाधिक ४७ . ३ डिग्री से.तापमानाची नोंद झाली. त्यामुळे वरणगावकरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच दीपनगर प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास भविष्यात वरणगाव व परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दीपनगरचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना वरणगाव पर्यावरण व मानवी जीवन संरक्षण समितीच्यावतीने निवेदन दिले.

निवेदनात वरणगाव शहरात पूर्वीपेक्षा यावर्षी दीपनगरमधून निघणाऱ्या बॉयलरच्या उष्णतेमुळे व प्रदूषणामुळे तापमानाची जिल्ह्यात सर्वाधिक नोंद झालेली आहे. त्यामुळे वरणगाव शहरात राहणारे नागरिक अत्यंत भयभीत झाले आहे. भविष्यात ६६० या नवीन वीज प्रकल्पामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आत्ताच उपायोजना झाली पाहिजे, त्यामध्ये वरणगाव शहर व परिसरात वृक्षरोपण करणे, त्यांचे जतन व संवर्धन करणे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य शिबीर घेऊन तपासणी करणे, सीएसआर फंडातून वरणगाव शहरात विविध विकास कामे मंजूर करा, अशा मागण्या केल्या आहेत. या मागण्यांची आपण दखल न घेतल्यास वरणगाव पर्यावरण मानवी जीवन संरक्षण समितीच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. तसेच उपाय योजना न केल्यास नवीन ६६० प्रकल्प सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही दिला आहे. यावेळी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी मागणीची तातडीने दाखल घेऊन उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले .

यांची होती उपस्थिती

यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे पर्यावरण व मानवी जीवन संरक्षण समितीचे अध्यक्ष मयूर शेळके, उपाध्यक्ष नाना चौधरी, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, सचिव सविता माळी, मुस्लिम अन्सारी, नामदेव सोनवणे, रामभाऊ माळी, मिलिंद भैसे, हितेश चौधरी, पितांबर पाटील, चंद्रकांत बढे, फजल शेख नूर मोहम्मद शेख, कामगार नेते मिलिंद मेढे, गणेश चौधरी, गोलू राणे, सुभाष पोतदार, कृष्णा महाजन, साबिर कुरेशी, रमेश पालवे, संदीप महाजन, बळीराम सोनवणे, योगेश माळी, गजानन वंजारी, आकाश निमकर, डॉ. नाना चांदणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here