साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी
असे म्हणतात की सात जन्माच्या रेशीमगाठी ह्या स्वर्गातच बांधल्या जातात आणि आता पर्यंत त्यालाचा मानले जात मात्र जर सात जन्माच्या रेशीम गाठी जर भुतालावरही बांधल्या गेल्यातर कठीणकाळ अवेळी वैधव्य व दोघा जीवांचा मनाचा मोठेपणा असेलतर हे शक्यच आहे हो तसेच काहींसे कजगाव येथे झाले आहे.
आणि ह्या रेशिंमगाठीचे सर्वांनीच कौतुक केले आहे कजगाव येथील नामदेव रामदास सोनार यांचा एक वर्षांपूर्वी अकस्मित मृत्यू झाला होता मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आई तीन भाऊ होते मात्र मुलींचे आपल्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने त्या पोरक्या झाल्या तर पत्नी वनिता यांचा पती म्हणून भक्कम आधार गेल्याने त्या पूर्णपणे निराधार झाल्या होत्या झालेले दुःख अत्यंत मोठे होते दिवसामागून दिवस जात राहिले व वनिता यांच्या पतीच्या मृत्यूला पूर्ण वर्ष लोटले गेले मात्र दोन्हीं मुली व वनिता पूर्णपणे निराधारच होते आता त्यांचे पुढे काय हा प्रश्न सर्वानाच पडत होता मात्र त्या आपल्या दोन्ही मुलींना कुठल्याही परिस्थितीत मोठे करायचे हा चंग मनाशी बांधला होता व एक दिवस नातेवाईक व मित्र परिवाराच्या बैठकीत वनिता व लहान दीर तुकाराम ह्या दोघांचे लग्न करण्याचा प्रस्थाव पत्रकार सुनील पाटील माजी ग्रा प सदस्य अनिल महाजन पत्रकार नितीन सोनार डॉ महेंद्र निकम अरुण पिंगळे दीपक दुसाने प्रकाश सोनार देविदास सोनार पुरूषोत्तम चव्हाण आदींच्या बैठकीत वनिता व तुकाराम यांच्यापुढे ठेवण्यात आला व वनिता यांना विचारण्यात आले की दीर दुकाराम यांचेशी लग्न केले तर चालेल का तर तुकाराम ला ही ह्या गोष्टीची कल्पना देण्यात आली दोघांना समोर बसवून हा एकमेकांची संमती घेण्यात आली व तुकारामने वनिताच्या वयाचा विचार व आपल्याच भावाची दोन्ही लहान कन्या यांचा विचार करून लग्नाला होकार दिला.
वणीतानेही अवेळी आलेले वैधव्य यांचा विचार करून होकार दर्शवला व दिनांक २५ रोजी बांबरुड राणीचे येथील बीजासनी मातेच्या मंदिरात नातेवाईक मित्रपरिवारांच्या उपस्थित छोटे खाणी कार्यक्रमात हा विवाह संपन्न झाला तुकारामने दाखलेला उदारपणा व वनिताने घेतलेला धाडसी निर्णयाचे सर्वांनीच कौतुक केले आहे यावेळी सुनील पाटील बबन सोनार राजेंद्र सोनार अरुण पिंगळे दीपक दुसाने माजी ग्रा प सदस्य अनिल महाजन डॉ महेंद्र निकम मधुकर सोनार नितीन सोनार पुरुषोत्तम चव्हाण देविदास सोनार प्रकाश सोनार गोपाल विसपुते आबा सोनार शाम सोनार नारायण राजपुत भुरा मास्तरी गुलाब महाजन व असंख्य समाजबांधवांच्या व मित्रपरिवाराच्या उपस्थित हा विवाह सोहळा संपन्न झाला.