यशाबद्दल अन्वरदे बु. गावात अनेकांनी केला सत्कार
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
तालुक्यातील अन्वरदे बु.।। गावातील वैभव पाटील यास नीट परीक्षेत ६४० गुण मिळवून उत्तीर्ण झालेला आहे. पहिल्याच प्रवेश फेरीत त्याचा रत्नागिरी शासकीय मेडिकल कॉलेजला नंबर लागला. वैभव हा सर्व साधारण शेतकरीचा कुटुंबातील, पोलीस पाटील शंकर पाटील यांचा नातू तर मा.सरपंच तथा विद्यमान उपसरपंच गणेश पाटील (वाघ परिवार) यांचा चिरंजीव आहे.
वैभव पाटील एमबीबीएस झाल्यास हा अन्वरदे बु.गावासह परिवारातील पहिला डॉक्टर असणार आहे. या यशाबद्दल वैभवचा माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पावरा, राष्ट्रवादी तालुका शशिकांत पाटील (शरद पवार गट), अन्वरदे बु. सरपंच गणेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.