
साईमत जळगाव प्रतिनिधी
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड हायस्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त ‘ उत्सव माझ्या राजाचा ‘ कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवकालीन शिवनेरी, रायगड सह ८० गड, किल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर होते. त्यांच्यासह विचार मंचावर प्राचार्य श्रीधर सुनकरी, प्रा.प्रसाद देसाई, प्रा. संध्या महाजन आदी उपस्थित होते. यात कथाकथन व पावडा गायन झाले. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या शौर्याची माहिती दिली. अफजल खानचा वध आणि पावड्यांमुळे सर्वांमध्ये शौर्याचे शहारे आले. या उत्साहाच्या वातावरणामुळे उपस्थित पालक आणि शिक्षकही भारावले. जिजामाता यांची भूमिका दर्शना वासुदेव महाजन यांनी केली.
बालशिवाजी अखिलेश मनीष धांडे, अफजल खान वध आणि राज्यभिषेक प्रसंगी शिवाजी महाराज यांची भूमिका सोहम दीपक गोरवाडकर या विद्यार्थ्याने साकारली.
बाल शिवशाहीर कुशल सुधीर जोशी, अफजल खानच्या भूमिकेत प्रफुल्ल मनोज जैन यांनी केली. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी, प्रीती बत्तीसे, साधना शिंदे, हर्षदा पाटील, महेश कोळी, अरविंद पाटील, दिपाली बाविस्कर यांनी केले.
किल्ले बनवा स्पर्धा
इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ला बनविणे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांनी सहभागी होत त्यांच्यातील सृजनशील व कलात्मक आविष्कारांचे दर्शन घडवले. या स्पर्धेत प्रथम क्र.पाटील निर्मल प्रशांत आणि गृप. (इयत्ता ६ वी). द्वितीय क्र. महाजन लिखित मुरलीधर आणि गृप (.इयत्ता ६ वी), तृतीय क्र. कुलकर्णी कुशाल अतुल (इयत्ता ६ वी) याप्रमाणे पहिल्या तीन विजेत्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कथकथन व पोवाडा स्पर्धा
इयत्ता २ री ते ४ थी च्या विद्यार्थ्यांबरोबर इच्छुक पालकांसाठी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथाकथन आणि पोवाडा गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात ३३ विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभागी होत उत्तमोत्तम कथाकथन आणि उत्कृष्ट असे पोवाडा गायन सादर केले.
पालकांसह कथाथन स्पर्धा
प्रथम क्र. बडगुजर अनन्या ललित (इयत्ता: ३ री), द्वितीयl क्र. पाटील खगेश पंकज (इयत्ता २ री). तृतीय क्र. चौधरी सानिका कल्पेश (इयत्ता ४ थी). याप्रमाणे पहिल्या तीन विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तक आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पालकांसह पोवाडा स्पर्धेत
प्रथम क्र. देशमुख प्राप्ती चंद्रशेखर (इयत्ता ४ थी), व्दितीय क्र. चौधरी वेदिका संदिप ( इयत्ता २ री). तृतीय क्र. साळी वैभवी बालू (इयत्ता ४ थी ). याप्रमाणे पहिल्या तीन विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तक आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
एकल पोवाडा गायन स्पर्धा
प्रथम क्र. पाटील जयदीप राहुल (इयत्ता ३ री). द्वितीय क्र.पाटील आराध्या तुकाराम (इयत्ता ३ री). तृतीय क्र. पाचपांडे मोक्षदा सतीश ( इयत्ता ३ री). याप्रमाणे पहिल्या तीन विजेत्या विजेत्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
के.सी.ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोडकर, प्रा. प्रसाद देसाई, प्रा.संध्या महाजन आदी उपस्थित होते. वडोदकर आणि देसाई यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राचार्य श्रीधर सुनकरी, उपप्राचार्या चंद्रकला सिंग, हेडमिस्ट्रेस स्मिता कुलकर्णी यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


