साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेरहून धरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी कुर्हे-सती माता मंदिर येथे अंतर्गत बोगद्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता दूचाकी वगळता सर्व जड वाहनांसाठी पुढील चार महिन्यासाठी बंद केला आहे. वाहनधारकांनी अमळनेरहून धरणगावकडे जाण्यासाठी ढेकू-सारबेटे मार्गाचा वापर करावा, असे आवाहन अमळनेर रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
अमळनेरहून-धरणगाव जातांना चांदणी कुर्हे-सती माता मंदिर येथे फाटक क्रमांक १३७ येथे एका बाजूच्या बोगद्याचे काम झाले आहे. एका बाजूचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारी, १८ सप्टेंबरपासून हा मार्ग पुढील चार महिन्यांसाठी जड वाहनांसाठी बंद असणार आहे. दूचाकी वगळता एसटी, ट्रक, ट्रॅक्टर, मालट्रक यांसारख्या जड वाहनांनी धरणगाव जाण्यासाठी ढेकू-सारबेटे या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.