Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»देश-विदेश»इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका इक्वेडोरमध्ये थेट सैन्य कारवाई, जागतिक तणाव वाढला
    देश-विदेश

    इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका इक्वेडोरमध्ये थेट सैन्य कारवाई, जागतिक तणाव वाढला

    SaimatBy SaimatMarch 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    US direct military action in Ecuador in the wake of the Iran war,
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वॉशिंग्टन / क्विटो

    इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने आणखी एका देशात थेट सैन्य हस्तक्षेप करत नवीन टेन्शन निर्माण केले आहे. यूएस साउथर्न कमांड (SOUTHCOM) च्या माहितीप्रमाणे, अमेरिका आणि इक्वेडोर यांनी संयुक्तपणे एका डिझाईनेटेड दहशतवादी संघटनेवर हल्ला केला.

    ही कारवाई 3 मार्च 2026 रोजी करण्यात आली असून इक्वेडोरच्या सैन्याने अमेरिकेच्या सैन्याशी सहकार्य केले. हल्ल्याचे उद्देश ड्रग्ज तस्करीशी संबंधित दहशतवाद थोपवणे असे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या सूत्रांनी म्हटले की, इक्वेडोरमधील वाढत्या ड्रग्ज तस्करीतून उभ्या राहिलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

    साउथर्न कमांडच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातील धोरणाचा पुढील टप्पा आहे. ट्रम्प प्रशासनाने दक्षिण अमेरिकेत विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले होते आणि याआधी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीवर नार्कोटेररिझमच्या आरोपांवरून कारवाई झाली होती.

    एकीकडे, इराण-इस्रायल युद्ध सातत्याने सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगात ऊर्जा बाजार, तेल आणि गॅस पुरवठा यावर परिणाम होत असून, जागतिक चिंता वाढली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणला प्रचंड नुकसान झाले असले तरी, उत्तर कोरिया आणि इतर काही देशांनी इराणला पाठिंबा दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

    या नवीन अमेरिकी कारवाईमुळे जागतिक तणाव वाढला आहे, तर इराण-इस्रायल युद्धामुळे भारतासह दक्षिण आशियामध्येही सुरक्षा चिंता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, जर युद्ध थांबले नाही, तर जागतिक ऊर्जा बाजारावर आणखी दबाव निर्माण होऊ शकतो, आणि आर्थिक घडामोडींवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

    युद्ध लवकर संपुष्टात यावे, अशी अपेक्षा जगभर व्यक्त केली जात आहे, परंतु परिस्थिती सध्यातरी अत्यंत संवेदनशील आणि अनिश्चित आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Indian:ओमानमधील ड्रोन हल्ल्यात भारतीय तरुणाचा बळी

    March 4, 2026

    श्रीलंकेजवळ इराणी सैन्य जहाजावर पाणबुडी हल्ला; 101 बेपत्ता, 78 जखमी, जहाजाला जलसमाधी

    March 4, 2026

    Russia on Ukriane : धाडधाड… रशियाचा युक्रेनवर नववर्षातील सर्वात भीषण हल्ला; 293 ड्रोन, 18 क्षेपणास्त्रांनी देश हादरला

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.